Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana || मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana In Marathi: चला जाणून घेऊया कसे 21 ते 65 वायोगातील महिलांना दर महा रु.१५००/- लाभ होऊ शकतो.

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पोषण व आरोग्य मध्ये सुधारणा, महिलांना आर्थिक धृष्ट्या स्वतंत्र बनवणे आणि तसेच कुटुंबामध्ये एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना” (Majhi Ladki Bahin Yojana) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.“माझी लाडकी बहीण योजना” (Majhi Laadki Bahin Yojana) ही २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वायोगातील महिलांना दर महा रु. १५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील

  1. विधवा
  2. विवाहित
  3. घटस्फोटीत
  4. कुटुंबातील एक अविवाहित महिला
  5. कौटुंबिक आधार नसलेले व घरातून नाकारण्यात आलेली महिला (परित्यक्त्वा).

पात्रता

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी.
  2. किमान वय २१ वर्ष पूर्ण व कमाल वय ६५ वर्ष पूर्ण होई पर्यंत.
  3. राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटीत, कुटुंबातील एक अविवाहित महिला, आधार नसलेले व घरातून नाकारण्यात आलेली महिला (परित्यक्त्वा).
  4. लाभार्थी महिल्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. २.५० लाखांपेक्षा कमी असणे गरजेचा आहे.
  1. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त आहे.
  2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  3. लाभार्थी महिला सरकारच्या इतर विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन दर महा Rs. १५००/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे.
  4. महिलाच्या कुटुंबातील सदस्य विध्य्मान किंवा माजी आमदार/खासदार आहे.
  5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहे किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहे. तथापि, Rs. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रानाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी.
  6. लाभार्थी महिल्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाधाक्ष्य/संचालक/सदस्य आहेत.
  7. लाभार्थी महिलेच्या कुटुंब सदसाच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रक्टर वगळता) नोंदणीकृत आहे.
  1. आधार कार्ड.
  2. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
    • अधिवास प्रमाणपत्र नसल्यास खालील पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र चालेल –
      • १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड.
      • १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र.
      • जन्म प्रमाणपत्र.
      • शाळा सोडल्याचा दाखला.
  3. लाभार्ती महिलेचा जन्म महाराष्ट्र राज्याचा नसल्यास पतीचे खालील पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र चालेल-
    • १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड.
    • १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र.
    • जन्म प्रमाणपत्र.
    • शाळा सोडल्याचा दाखला.
    • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
  4. शुभ्र रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र.
  5. नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्ड मध्ये नोंद नसल्यास – विवाह प्रमाणपत्र तसेच पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून स्वीकार करण्यात येईल.
  6. बँक खाते तपशील (खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे).
  7. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो.
नावमुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
प्रस्तुत कोणी केलीराज्य सरकार
राज्याचे नावमहाराष्ट्र
कधी राबविण्यात आली२७ जून २०२४
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगातील विधवा, विवाहित, घटस्फोटीत, कुटुंबातील एक अविवाहित महिला, आधार नसलेले व घरातून नाकारण्यात आलेली महिला (परित्यक्त्वा).
अनुदानRs. १५००/- दर महिना DBT द्वारे जमा (आधार लिंक बँक खात्यात)
योजनेचे उधिष्टMajhi Ladki Bahin योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पोषण व आरोग्य मध्ये सुधारणा, महिलांना आर्थिक धृष्ट्या स्वतंत्र बनवणे आणि तसेच कुटुंबामध्ये एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी मदत करण्यासाठी.
अर्ज कसे भरता येतीलऑन-लाईन आणि ऑफ-लाईन
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. २.५० लाख पेक्षा कमी असल्याचे प्रमाण पत्र, बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे), लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो.
अधिकृत वेब-साईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
ऑन-लेईन अर्ज भरायची वेब-साईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in
योजनेसाठी हेल्प-लाईन टोल फ्री संपर्क क्रमांक१८१

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा भरायचा (How To Apply for Majhi Ladki Bahin Yojana)

लाभार्थी महिला “माझी लाडकी बहिण” योजनेचा अर्ज ऑन-लाईन अथवा ऑफ-लाईन पद्धतीने करू शतकात.

माझी लाडकी बहिण योजनेसाठीची ऑन-लाईन पद्धत:

  1. अधिकृत वेब-साईट वर जाणे.
  2. “अर्जदार लॉगीन” वर क्लिक करून “create account” वर क्लिक करा.
  3. “Registration form” वर तुमची संपूर्ण अचूक माहिती विचारलेल्या स्वरुपात भरा.
  4. “Captcha” code भरा. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येईल.
  5. मोबाईल नंबर वर आलेला OTP आणि “Captcha” code भरा.
  6. “Verify OTP” वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबर वर “login was successful” चा मेसेज येईल.
  7. “मोबाईल नंबर”, “पासवर्ड”, “Captcha” भरून लॉगइन करा.
  8. “Application of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” वर क्लिक करा आणि आधार नंबर व Captcha भरा.
  9. “Valid Aadhaar” वर क्लिक करा आणि “Registration form” वर तुमचे applicant’s name, bank details, permanent address अचूक भरणे आवश्यक आहे.
  10. आवश्यक कागदपत्रे साईट वर अपलोड करा.
  11. “Submit” वर क्लिक केल्यावर तुम्हाला SMS द्वारे “Application ID” प्राप्त होईल.

माझी लाडकी बहिण योजनेसाठीची ऑफ-लाईन पद्धत:

  1. स्थानिक जिल्हा परिषद किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट द्या.
  2. अर्ज अचूक भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडा.
  4. अर्ज दाखल करून घ्या.

अर्जाची स्थिती अश्या प्रकारे तपासा

  1. अधिकृत साईट वर जाऊन आपला “मोबाईल नंबर”, “पासवर्ड”, “Captcha” भरून लॉगइन करा.
  2. “Applications Made Earlier” वर क्लिक करा व “Application ID” द्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
  3. “नारी शक्ती” app द्वारे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana Installment Update – “माझी लाडकी बहीण” योजनेचे हफ्ते खात्यात जमा

माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेच्या खात्यात पहिला आणि दुसरा हफ्ता १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जमा झालेला आहे.

लाडक्या बहिणीच्या खात्यात रु. ३०००/- इतकी रक्कम आधार लिंक बँक खात्या मध्ये जमा करण्यात आली आहे. ही रक्कम जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची मिळून देण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेच्या खात्यात तिसरा हफ्ता २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जमा झालेला आहे.

लाडक्या बहिणीच्या खात्यात रु. १५०० /- व रु. ४५००/- इतकी रक्कम आधार लिंक बँक खात्या मध्ये जमा करण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थी महिलेच्या खात्यात चौथा आणि पाचवा हफ्ता ४ ऑक्टोबर २०२४ ला जमा झालेला आहे.

लाडक्या बहिणीच्या खात्यात रु. ३०००/- इतकी रक्कम आधार लिंक बँक खात्या मध्ये जमा करण्यात आली आहे. ही रक्कम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांची मिळून देण्यात आली आहे.

FAQ’s

1. Majhi Ladki Bahin Yojana “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी?

महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील गातील विधवा, विवाहित, घटस्फोटीत, कुटुंबातील एक अविवाहित महिला, कौटुंबिक आधार नसलेले व घरातून नाकारण्यात आलेली महिला (परित्यक्त्वा).

2. “माझी लाडकी बहीण” योजने मध्ये आर्थिक मदत किती केली जाते?

या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वायोगातील महिलांना दर महा रु. १५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

3. वार्षिक उत्पन्न किती असल्यास महिला या योजने साठी पात्र ठरते?

लाभार्थी महिल्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. २.५० लाखांपेक्षा कमी असणे गरजेचा आहे.

4. “माझी लाडकी बहिण” योजना मी ऑफ-लाईन पद्धतीने अर्ज देऊ शकतो का?

हो, स्थानिक जिल्हा परिषद किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन तुम्ही ऑफ-लाईन अर्ज देऊ शकता.

5. मी माझ्या अर्ज भरल्याची स्थिती कस तपासू?

तुम्ही तुमच्या अर्ज ची स्थिती योजनेची अधिकृत वेब-साईट, नारी शक्ती app किंवा स्थानिक गरम पंचायतीला भेट देऊन तपासू शकता.