Aam Aadmi Bima Yojana || आम आदमी बिमा योजना

Aam Aadmi Bima Yojana

Aam Aadmi Bima Yojana (आम आदमी बिमा योजना ) In Marathi:

Aam Aadmi Bima Yojana In Marathi: सन २००७-०८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्त मंत्री, केंद्र शासन यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या भूमीहीन लोकांसाठी “आम आदमी बिमा” योजना राबविण्याचे प्रस्तावित केले होते. आम आदमी बिमा योजना केंद्र सरकार ने २ ऑक्टोबर, २००७ रोजी राबविण्याची घोषणा केली. ही योजना केंद्र सरकार, राज्य सरकार समवेत राबवणार आहे.

एकून कार्याबलांपैकी सुमारे 93% जनसंख्या ही असंघटीत क्षेत्रातील कामगार आहेत. ह्यातले बहुसंख्य कामगार हे अजूनही सामजिक सुरक्षा नसलेले आहेत. किंबहुना ह्या सर्व कामगारांना ही सामाजिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने केंद्र सरकार ने Aam Admi Bima Yojana “आम आदमी बिमा योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या कामगारांच प्रमुक चिंतेचा कारण म्हणजे आजारपणाच्या सतत होणाऱ्या घटना आणि अश्या वेळी कामगरांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करायची गरज. या चिंतेचा निवारण करण्याच्या उद्देशाने आम आदमी बिमा योजना ही गरीब कुटुंबांना आरोग्य खर्चाच्या जोखमीपासून संरक्षण प्रदान करण्याचा एक मार्ग आहे. गरीब लोक आरोग्य विमा धेण्यास नकार देतात ह्याचा मुख्य कारण म्हणजे त्याचे बसणारे हप्ते महाग असतात किंवा त्यांना अजून त्याचे फायदे समजलेले नसतात. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम आदमी बिमा योजनेची अंबलबजावणी केली गेली आहे.

Aam Aadmi Bima Yojana – आम आदमी बिमा योजना ही LIC (Life Insurance Corporation Of India) ह्या कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत विमा तसेच लाभार्थी सदस्याच्या ९ ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या २ मुलांना LIC मार्फत प्रती तिमाही प्रती मुलास रु. ३००/- इतकी शिष्यवृत्ती दिली जेईल.

Aam Aadmi Bima Yojana | आम आदमी बिमा योजनेचे लाभार्थी

ग्रामीण भागात राहणाऱ्या भूमीहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार असलेल्या कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती असेल.

Aam Aadmi Bima Yojana | आम आदमी बिमा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

१. आधार कार्ड – अर्जदाराकडे योग्य आधार कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून असणे आवश्यक आहे.

२. वयाच्या पुराव्यासाठी लागणारे कागदपत्रे – जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र/पासपोर्ट.

३. घराच्या पत्याचा पुराव्यासाठी लागणारे कागदपत्रे – घराच्या विजेचा बिल/पासपोर्ट/वाहन चालवण्याचा परवाना.

४. बँक खात्याचे तपशील – अर्जदाराकडे चालू बँक खाते/बँक खात्याचा नंबर/IFSC कोड असणे आवश्यक.

५. वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र.

६. व्यवसायाचा पुरावा.

Aam Aadmi Bima Yojana | आम आदमी बिमा योजने अंतर्गत विमा हप्त्याची रक्कम अशी नियोजली गेली आहे

१. या योजने अंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) विम्याचा हफ्ता हा वार्षिक स्वरुपात असेल.

२. विम्याची रक्कम ही रु. २००/- प्रती सदस्य इतकी असेल.

३. या रु. २००/- पैकी ५०% रक्कम म्हणजेच रु. १००/- केंद्र सरकार मार्फत आम आदमी बिमा योजना सामाजिक सुरक्षा निधीतून देण्यात येईल.

४. उर्वरित ५०% म्हणजेच रु. १००/- राज्य सरकार कडून देण्यात येतील.

५. लाभार्थ्यान वर विमा हफ्त्याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

६. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विमा हप्त्याच्या एकूण रकमेचे प्रदान भारतीय आयुर्विमा महामंडळास (LIC) करेल.

Aam Aadmi Bima Yojana | आम आदमी बिमा योजने अंतर्गत भरपाई रक्कमेची माहिती

विमाच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास रु. ३०,०००/- मिळतील
सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यासरु. ७५,०००/- मिळतील
सदस्याचा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास रु. ७५,०००/- मिळतील
सदस्याचे अपघातामुळे दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यासरु. ७५,०००/- मिळतील
सदस्साचे अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास रु. ३७,५००/- मिळतील

पात्रता

  • अर्जदार हा १८ ते ५९ वयोगटातील असावा.
  • अर्जदार हा गरिबी रेषेच्या खालचा असावा व वार्षिक उतपन्न हे रु. १,००,०००/- पेक्षा खाली असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणे गरजेचे आहे – भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर, मच्छीमार, विणकर, हस्तकला कारागीर आणि ग्रामीण भागातील समान कामात गुंतलेले लोक. या व्यतिरिक्त, ही योजना शहरी भागात खालील कामांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना देखील लागू होते – रस्त्यावरचे विक्रेते आणि स्वच्छता कामगार.
  • अर्जदार इतर कोणत्सायाही सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट नसावा, उदाहरण राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना किंवा इतर कोणत्याची सरकारी जीवन विमा योजना.

अपात्रता

  • अर्जदार हा सरकारी कर्मचारी किंवा भविष्य निर्वाह निधीसह (Provident Fund) खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या संघटीत क्षेत्रात कार्यरत नसावा.
  • अर्जदार हा आयकरदाता नसावा.
  • अर्जदार हा दुसऱ्या कोणत्याही विमा योजनेचा लाभ घेणारा नसावा.
  • जी व्यक्ती त्या कुटुंबातील प्रमुख किंवा एकुलती एक कमावणारी व्यक्ती नसल्यास अर्ज करता येणार नाही.
  • जी व्यक्ती १८ वयापेक्षा कमी किंवा ५९ वयापेक्षा जास्त असल्यास अर्ज करता येणार नाही.

आम आदमी बिमा योजनेची अर्ज भरायची प्रक्रिया (Aam Aadmi Bima Yojana application process)

ऑफ-लाईन पद्धत:

  • आम आदमी बिमा योजना केंद्र किंवा विमा एजेंत कडून अर्ज प्राप्त करावा.
  • अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, उत्पन्न, व्यवसाय आणि बँक खाते तपशील आणि इतर सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्जासोबत आधार कार्ड, वयाचा पुरावा, बँक खात्याचे तपशील, उत्पन्नाचा दाखला आणि व्यवसायाचा पुरावा यासारखे आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • पूर्ण अर्ज अचूक भरून आणि सहाय्यक कागदपत्रां सोबत, अर्ज आम आदमी बिमा योजना किंवा विमा एजेंत कडे सुपूर्द करा.
  • अर्ज आणि सहाय्यक कागदपत्रे बरोबर असल्यास, पॉलिसी प्रमाणपत्र जरी केले जाईल.
  • पॉलिसी प्रमाणपत्र अर्जदाराने दिलेल्या पत्यावर पाठविण्यात येईल.

आम आदमी बिमा योजने अंतर्गत भरपाई रक्कमेचा दावा कसा करायचा

इतर विमा योजनेच्या तुलनेत, आम आदमी बिमा योजने मध्ये भरपाई रकमेचा दावा करणे सोपे आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी चा दुर्दैवी मृत्यू किंवा अपघात झाल्यास आर्थिक मदत केली जाते.

नैसर्गिक मृत्यू झाल्यास भरपाई ची प्रक्रिया:

नैसर्गिक मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या नोमिनी ने मृत्यू प्रमाणपत्र द्वारे भरपाई साठी अर्ज करता येईल. लाभार्थीच्या मृत्यू समयी आम आदमी बिमा योजना ही सक्रीय हवी. नोडल अजेन्सी ला भेट देऊन अर्ज भरावा.

अर्जा सोबत लागणारे कागदपत्रे:

१. आम आदमी बिमा योजना मृत्यू दावा चा अर्ज.

२. मृत्यू प्रमाणपत्र (मूळ आणि प्रत).

अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई ची प्रक्रिया:

इथे सुधा अर्ज भरायची प्रक्रिया नैगार्गिक मृत्यू झाल्यास करतो तशीच आहे पण इथे अजून काही कागदपत्रे अजून लागतात. मृत्यू प्रमाणपत्राच्या व्यतिरिक्त लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे आहेत-

  • FIR ची प्रत
  • पोलिक निष्कर्ष अहवाल/ पोलीस अंतिम अहवाल
  • पोलीस चौकशी अहवाल
  • पोस्त मॉर्टम रिपोर्ट

अपंगत्व आल्यास भरपाई ची प्रक्रिया:

पूर्ण किंवा आंशिक अपंगत्व आल्यास, लाभार्थीच्या नोमिनी आम आदमी बिमा योजने अंतर्गत भरपाई साठी अर्ज करू शकतो. अर्ज सोबत लागणारे कागदपत्रे:

१. पोलीस FIR ची प्रत.

२. वैद्यकीय प्रमाणपत्र: ते सरकारी सिव्हिल सर्जन/पात्र सरकारी ऑर्थोपेडिशियाने जारी केले पाहिजे ज्यामध्ये अपघाताचा तपशील जसे की योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या सदस्याचे अपंगत्व आणि अवयवांचे नुकसान.

अधिकृत वेब-साईटhttps://www.myscheme.gov.in/schemes/aaby

इतर योजनाची माहिती घेण्यासाठी इथे भेट द्या : https://mahayojananews.com/

लाडकी बहिण योजनेच्या माहिती साठी इथे भेट द्या: https://mahayojananews.com/ladki-bahin-yojana/